| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळ हमरापूर फाटा पुलावर पहाटे 4:15 वा. एच.पी. गॅस ट्रक (MH-12-EQ-2208) व महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-07-AJ-2682) मध्ये हा अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.
देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन जात असताना एच. पी. गॅस ट्रकला मागून जोरदार टक्कर दिल्याने महिंद्रा बोलेरो पिकअप मधील सुमित चंद्रकांत खवळे वय 28 रा.देवगड-सिंधुदुर्ग हा गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे वय 24 रा.देवगड-सिंधुदुर्ग ही जागीच ठार झाली.
अपघातस्थळी दोन्ही वाहने एकमेकांत अडकून असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघात झाल्याचे कळताच अपघातग्रस्तांचे वाली देवदूत कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दादर सागरी पोलीस व पेण पोलीसांनी घटनास्थळी जावून अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.