। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कार्यकर्ते, नेत्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली होती. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण पसरले.