| माथेरान | वार्ताहर |
ऐन सुट्टयांच्या हंगामात विविध भागात अनियमित त्याचप्रमाणे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याच्या जटील समस्येबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या माध्यमातून येथील फिल्टर हाऊस येथील पाणी पुरवठा विभागाचच्या उपअभियंत्यांना या समस्येवर ताबडतोब तोडगा काढून नागरिकांना वेळेत आणि नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या शिष्टमंडळाने मंगळावार (दि.9) रोजी घेराव घालून आपल्या समस्या कथन केल्या, तसेच या समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
या सर्व समस्येवर लवकरच तोडगा काढून नागरिकांना वेळेत पाणी पुरवठा केला जाईल त्याचप्रमाणे आठवड्यातून सर्वांच्या मते ठराविक एका दिवशी पाणी कपात करण्यात येईल असे उपअभियंता भारत पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी संगीता जांभळे, सुहासिनी दाभेकर, स्वप्निल गोसावी, केतन रामाणे, भास्कर शिंदे, संजय कदम, वीरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
नेहमीच पाण्याची समस्या स्थानिकांना उद्भवत असते. जीवन प्राधिकरणची सेवा समाधानकारक नसते याकामी ज्या ज्या ठिकाणी जुने पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग केला पाहिजे आणि हे काम केवळ नगरपरिषदेच्या मार्फत होऊ शकते त्यासाठी हे पाणी पुरवठा खाते नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेतल्याससर्वच अडचणींवर मात करता येऊ शकते.
माथेरान नागरिक