| खांब-रोहा | वार्ताहार |
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रा.पंचायत हद्दीमध्ये सुदर्शन कंपनी धाटावतर्फे माझा कचरा माझी जबाबदारी अंतर्गत सर्वक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी नो -हाऊ फाऊंडेशन इनोरा पुणे येथून आभा तडवळकर, कुमार ओव्हाळ, विजय भालेकर, आदित्य जोशी, विनय देशमुख, चेतन चौधरी, अमर चांदणे. व सुदर्शन केमिकल्स प्रा.लि.रोहा येथील अधिकारी तसेच रविंद्र मरवडे, संदिप मरवडे, राम मरवडे, वसंत मरवडे, दयाराम मरवडे, हरिश्चंद्र मांगुळकर, खेळू मरवडे, नामदेव मरवडे, नंदू मरवडे, नाना शिंदे, सुरेश मरवडे, पांडुरंग नागावकर, सुरेश वाघमारे, प्रशांत नागावकर, ठमाजी महाडिक, तुकाराम बामणे, अनंता लोखंडे, ग्रा.वि.अधिकारी सौ.पिंपळकर आदी उपस्थित होते.