महाविकास आघाडीने विचारला महानगरपालिकेला जाब
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जाचक मालमत्ता कराविरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे. यासंदर्भात पनवेल- उरण महविकास आघाडीने वेळोवेळी आंदोलने, मोर्चा, उपोषणे करून जनतेसाठी न्याय मागितला होता. परंतू भाजपप्रणित सत्ताधारी व महानगरपालिका प्रशासन जनतेला दिलासा देण्या ऐवजी नोटिसा देण्यात व मालमत्ता जप्ती करण्यामध्ये मशगुल असल्याने याच्या निषेधार्थ (दि.19) रोजी महाविकास आघाडीतर्फे महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला .
यावेळी पनवेल-उरण महविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. बाळाराम पाटील, शिरीष घरत, सुदाम पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, रामदास पाटील, नंदराज मुंगाजी, एकनाथ म्हात्रे, दिपक घरत, शशिकांत डोंगरे, डी. एन मिश्रा, विश्वास पेटकर, शांताराम कुंभारकर, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, हेमराज म्हात्रे, नारायण घरत, गणेश कडू, रवींद्र भगत, महिला आघाडीच्या निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग, प्रीती जॉज, श्रुती म्हात्रे, माया अहिरे, जी. आर. पाटील, मल्लीनाथ गायकवाड, सतीश मोरे, गायकवाड सर, गणेश पाटील, प्रभाकर गोवारी, विश्वास म्हात्रे, शशिकांत बांदोडकर आदींनी यावेळी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेटे यांची भेट घेऊन यासंदर्भात व्यावसायिकांना मालमत्ता कराबाबत जप्तीच्या नोटिसा बजावल्याचा निषेध करण्यात आला .
जनभावनेचा आदर करून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी महविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील यांनी यावेळी केली. तसेच लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनांत व पुढील आठवड्यात आयुक्त गणेश देशमुख यांच्या बरोबर बैठक लावून वाढीव मालमत्ता कर रद्द काण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी माजी आ. बाळाराम पाटील यांनी केली. अन्यथा भविष्यात सर्वसामान्य नागरिक, लहान मोठे व्यावसायिक, सामाजिक-राजकीय संघटना व महाविकास आघाडी लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा रस्तावर उतरतील असा इशारा महाविकास आघाडी सचिव व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांनी यावेळी दिला आहे .