सोगाव | वार्ताहर |
रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील थळे यांनी परहूर येथील श्री. समर्थ वृद्धाश्रम येथे कुटुंबियांसहित जाऊन वृद्धांसोबत केक कापून आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी थळे यांनी वृद्धांना खाऊवाटप करत वृद्धांचे आशीर्वाद घेतले, तसेच वृद्धाश्रमासाठी वृद्धाश्रमाचे चालकमालक ॲड. गुंजाळ यांच्याकडे आर्थिक मदत देत यापुढेही कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी मी तत्पर हजर राहीन, असे आश्वासन दिले. यावेळी सुनील थळे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री सुमित्रा थळे, मापगाव सरपंच ऊनीता थळे, पत्नी, भावजय, भाऊ, बहिणी, मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे व इतर नातेवाईक यांच्यासह ज्येष्ठ गुरुवर्य केशव चांदोरकर, विवेक जोशी, प्रफुल्ल थळे, माजी उपसरपंच समद कुर, चंद्रकांत खोत, अनिल जाधव, संजय शिंदे, विजय घरत, जया ढोले, सचिन घाडी, तनजीम कुर, सूचित थळे, अनंता भगत, अरविंद माने, विकास राणे, बाबु गोंडाळ, व्ही. के. बनगर सर, साहिल कुर, मुनवर कुर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.