| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील वाणदे येथे श्रीमारुती मंदिर सभागृहात शे.का.प. जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचे कडून मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपाचा सामाजिक कार्यक्रम ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शिबिराचे उदघाटन शेकाप मुरूड तालुका चिटणीस अजित कासार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी 400 महिला व पुरुषांची मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आले. अजित कासार मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेकाप हा पक्ष गोर गरीब जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने पोहचून कष्टकरी महिला पुरुषांचे आणि युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवित असतो. मुलींसाठी सायकल वाटप, शेकडो ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, युवकांसाठी नोकरीच्या संधी असे सामाजिक उपक्रम चित्रलेखा पाटील यांचे कडून यशस्वीपणे राबविले असल्याचे सांगितले. आ.जयंत पाटील, पंडित पाटील, चित्रलेखा पाटील, पप्पूशेठ पाटील आदी शेकाप नेत्यांनी वाणदे गावात अनेक सामाजिक कामे आणि उपक्रम यशस्वीपणे राबविले असल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी राहील कडू, रमेश दिवेकर, अमोल पाटील, श्रीकांत वारगे, डॉक्टर स्टाफ, अशोक नाक्ती, प्रदीप दिवेकर, लक्ष्मण वारगे, चंद्रकांत बेडेकर, शंकर ठाकूर, धर्मा हिरवे, राजेश्री गायकर, गोपाळ वारगे, काशिनाथ माळी, गुलाब वाघमारे, घनश्याम श्रीवर्धनकर, जनार्दन मांदाडकर, दत्तात्रय पाटील, मनोहर पोरणेकर, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.