| सोगांव | वार्ताहर |
अलिबाग- रेवस मार्गावर धोकवडे ग्रामपंचायत हद्दीतील धोकवडे न.1 येथे रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे वडाचे झाड अचानक भररस्त्यात पडून वाहतूक ठप्प झाली होती. सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील यांनी पुढाकार घेत हा कोसळलेला वृक्ष धोकवडे येथील शंकरआप्पा म्हात्रे यांच्या जेसीबीच्या साहाय्याने झाड तोडण्यास सांगून व पर्यायी हाताने बाजूला करत ठप्प झालेली वाहतूक काही वेळातच सुरळीत केली. यासाठी पाटील मॅडम, मंगेश माळवी, रुपेश भगत, संजय म्हात्रे, अकुश पाटील, महेश म्हात्रे, शिवप्रसाद तोडणकर, सुनील पाटील, संजय माळवी, धिरज पाटील, जयसिग म्हात्रे, संजय पाटील, जयेश भगत, सचिन भगत, समीर भगत, निनाद शेळके, प्रशांत गावंड, सुजित गावंड आणि इतर धोकवडे ग्रामस्थ, माडंवा पोलीस, पिंट्या गायकवाड मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी, धोकवडे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी सुद्धा यावेळी विशेष सहाय्य केले.