| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमध्ये दुपारपासून सुरु झालेल्या पावसामुळे अलिबाग – पेण मार्गावरील गोकुळेश्वरनजीक वडाचे झाड रस्त्यावरच कोसळले. त्यामध्ये रस्त्याच्या बाजुला उभी केलेल्या चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी टळली. या मार्गावरील रस्त्याच्या दुर्तफा असलेली झाडे जीर्ण झाली आहे. वारंवार ही झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे या झाडांची कटाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.