। कोर्लई । वार्ताहर ।
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुरुडमधील दत्त मंदिर राजवाडा परिसरात डोंगरावर लागलेल्या वणव्याचा परिणाम नबाबाच्या राजवाड्यासमोर रस्त्याच्याकडेला असलेले शेकडो वर्षे जुने वडाच्या झाडाला आग लागून मंगळवारी (दि.26) पहाटे पाच वाजताच्या सुमारास हे झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने जिवित व वित्तहानी टळली असली तरी काहीकाळ वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. सकाळच्या वेळेत दूध वाहतूक, मुंबई-पुणे प्रवास करणार्यांना याचा त्रास सहन करावा लागला.
यावेळी रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याचे वृत्त समजताच प्रादेशिक वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी विजय कोसबे, संदीप घरत, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राठोड, सहाय्यक फौजदार दिपक राऊळ, ठाणे अंमलदार गणेश डोंगरे, मकरंद पाटील, पो.काँ.धनंजय पाटील, नायब तहसीलदार संजय तवर, नगरपरिषदेचा जेसीबी व अग्निशमन दलाची गाडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावर आडवे झालेले झाड हटविण्यात येऊन