। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 या स्पर्धेला आयपीएलच्या 17व्या हंगामानंतर (दि.1) जूनपासून सुरुवात होणार आहे. याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने विश्वचषक स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. यामुळे करोडो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘इंग्लंडचा पुरुष क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आज पुष्टी केली आहे की, जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकापूर्वी निवडीसाठी त्या नाव विचारात घेतले जाणार नाही.’ निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराचे लक्ष केवळ कसोटी क्रिकेटसाठीच नव्हे तर भविष्यातील सर्व क्रिकेटसाठी गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असणे आहे. इंग्लंड संघ वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध दोन-तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.’