|अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सागाव येथील मारुती मंदिराच्या मागे असलेल्या धरणात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला . ही घटना बुधवारी (दि. 31 ) डिसेंबरला घडली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. सर्वजण थर्टी फर्स्टच्या तयारीत असताना ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.





