| परभणी | वृत्तसंस्था |
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहुन सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत.
जिंतुर-सोलापुर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल 50 फूट खोल नदीपात्रात कोसळली. बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणेने तात्काळ या सर्व प्रवाशांना बाहेर काढुन खाजगी वाहनांतून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून, यात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.