मोहोपाडा येथे बस थांबा साकारणार

| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोहोपाडा शहरात प्रवेशद्वारानजीक बसथांब्याची दुरावस्था असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रसायनी पाताळगंगा हे औद्योगिक क्षेत्र असल्याने मोहोपाडा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे बाजारहाट करण्यासाठी येणार्‍या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. येथील वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 63000 हजारांच्या आसपास असल्याचे येते. येथील नागरिकांना यावेळी एसटी बसची वाट पाहत मोहोपाडा मच्छि बाजाराजवळील बस थांब्यावर उभे राहत असताना अनेकांना मच्छिबाजारातील वासामुळे पोटात मळमळणे, उलटी होणे, डोकं दुखणे आदी व्याधींचा त्रास होत असे.

याअगोदर रिक्षा थांब्याजवळ एचओसी बसथांबा आहे परंतु त्याची दुरावस्था झाल्याने या बसथांब्याचा कोणीही प्रवासी वापर करीत नाही. येथील बसथांब्याची अथवा नवीन व्हावे असे प्रवासी वर्गातून मागणी होत होती. हि समस्या रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित शहा यांनी लक्षात घेऊन नागरिकांसाठी नवीन बसथांबा उभारण्याचे ठरवून त्याचे भूमिपूजन संदिप मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदीप पाटील,रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित शहा, धिरज जैन, विजय पाटील, देवेंद्र महिंद्रकर, गणेश काळे, बाळकृष्ण होनावळे, कुरुप, संदिप साबळे, मनोहर पाटील आदी रोटरीयन उपस्थित होते. रोटरी क्लबच्यावतीने मोहोपाडा रिक्षा थांब्याजवळ बस थांबा साकारणार असल्याने प्रवाशांसह नागरिकांनी रोटरीचे आभार मानले.

Exit mobile version