कारची दुचाकीला धडक

| ठाणे | वार्ताहार |

शहापुर येथील म्हसोबा मंदीराजवळील वळणावर, मोटार सायकल (एमएच-06-एई-4359) चालक रा. धाकटे शहापुर व पुतणी हे दोघे शहाबाजला जात असतान पेझारी बाजुकडुन येणारी कार (एम एच-06-बीई-1537) चालक रा. धेरंड याने रस्त्याच्या परिस्थीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने चुकीच्या बाजूने गाडी चालवुन मोटार सायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात कारचालकाने मोटार सायकलवरील दोघांना गंभीर दुखापत करुन तेथून पळ काढला. याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहवा कल्पेश नलावडे हे करीत आहेत.

Exit mobile version