300 फूट खोल दरीत कोसळली कार

आंबा घाटात अपघात; कार चालकाचा मृत्यू
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात संजय जोशी(63) या कार चालकाचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कंपनीची चारचाकी कोल्हापूरवरून रत्नागिरीच्या दिशेने निघाली असता आंबा घाटातील वळणावर संरक्षणकठड्याजवळून ती थेट दरीत कोसळली. या घटनेची माहिती देवरुख पोलीसांसह रेस्क्यू टीमला देण्यात आली होती. माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव, वाहतूक शाखा सहाय्यक निरीक्षक अमरसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात रेस्क्यू ऑपरेशन पार पडले. यावेळी देवरुख मधील राजू काकडे हेल्प अकॅडमी, आंबा मधील वसुंधरा हेल्प अकॅडमी, राजा गायकवाड,पोलीस किशोर जोयशी,अक्षय महाडिक आदींची रेस्क्यू ऑपरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली.

Exit mobile version