एझरबिया कंपनीवर गुन्हा; जमीन खरेदी व्यवहारात केली फसवणूक

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मागील दहा वर्षांपूर्वी शेकडो एकर जमिनीची खरेदी करणाऱ्या आयफेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील वरई येथील जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी जमिनीचे मूळ मालक यांनी फसवणुकीची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल केली होती. दरम्यान, याप्रकरणी आयफेल प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे कर्जत तालुक्यात गृह प्रकल्प साकारणाऱ्या एझरबिया कंपनी या नावाने वावरत आहे.

2007 मध्ये सिलवेक्स रियाल्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावरील वरई येथे साधारण 46 एकर खरेदी केली. ती जमीन विकसित करण्यासाठी 10 गुंतवणूकदारांनी सिलकेस रियाल्टीमध्ये काही कोटी रुपये यांची गुंतवणूक केली होती.2009 मध्ये या कंपनीने सदर वरई येथील जमीन पुणे येथील आयफेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकसित करण्यासाठी दिली. त्यावेळी 2007 मध्ये संबंधित जमीन विकसित करण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या सर्व दहा गुंतवणूकदारांना त्यांचा हिस्सा विकसित करून देण्याचे ठरले होते. मात्र, संबंधित जमिनीचा खरेदी व्यवहार कर्जत सब रजिस्टर कार्यालयात नोंदणीकृत झाला होता. त्यावेळी सिलवेल्स रीयाल्टीने आयफेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार करताना त्यांच्या सर्व गुंतवणूकदार आणि स्वतः सिल वेक्स कंपनीला तीन बंगलो बांधून देण्याचे ठरले. मात्र, आपण व्यावसायिक असल्याने त्याची बोलणी कागदावर घ्यायची काही आवश्यकता नाही. मुखातून निघालेले शब्द महत्त्वाचे आहेत असे बोलून दहा गुंतवणूकदारांचा विषय सातत्याने टाळला गेला.

2007 मध्ये जमीन विकसित करण्यासाठी तब्बल पाच कोटी आठ लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या दहापैकी सात गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. त्यामुळे ते सर्व सात गुंतवणूकदार हे सिलवेल्स कंपनीकडे आपले पैसे परत द्यावेत यासाठी तगादा लावून होते. शेवटी सिलवेल्स रीयल्टी या कंपनीचे बाजारात असलेल्या नावाला धक्का लागू नये यासाठी या कंपनीचे संचालक शैलेश महाडिक यांनी त्या सर्व सात गुंतवणूकदार यांचे पैसे व्याजासह परत केले. परंतु, आयफेल कंपनीकडून सदर जमिनीवर गृह प्रकल्प साकारण्यास सुरुवात केली असून, किमान एक हजार फ्लॅटची विक्री केली आहे. तरीदेखील आपले पैसे परत केले जात नसल्याने सिलवेल्स रीयल्टी कंपनीचे संचालक शैलेश महाडिक यांनी आयफेल कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हे दाखल केला आहे. त्यात पुणे येथे राहणारे राहुल नहार आणि विशाल नहार यांनी आपल्या कंपनीची आणि सात गुंतवणूकदार यांची फसवणूक केली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे 30 ऑगस्ट रोजी दाखल केली होती.

त्या तक्रारी वरून नेरळ पोलीस ठाणे येथे आयफेल कंपनीचे दोन संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे करीत आहेत. आयफेल कंपनी कर्जत तालुक्यात एझरबिया या नावाने गृह प्रकल्प साकारत आहे. या कंपनीचे खाडेपाडा, मानिवली तसेच वरई येथे गृह प्रकल्प उभे असून, ताडवाडी येथे काहीशे एकर जमीन आहे.

Exit mobile version