। नागोठणे । वार्ताहर ।
बकर्या चारण्यासाठी गेलेल्या आदिवासी महिलेने फिर्यादी व साक्षीदार यांना शिव्या दिल्या. त्यानंतर याच आदिवासी महिलेसोबत आलेल्या इतर तीन आदिवासी पुरुषांपैकी एका आदिवासीने फिर्यादी यांच्या पत्नीचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने याप्रकरणी चार आदिवासी आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत रिओ बिस्ता, मांडवशेत येथे आरोपी नं. 4 ही आदिवासी समाजाची महिला बकर्या चारण्यासाठी आली, असता ती फिर्यादी व साक्षीदार यांना शिव्या देवून निघून गेली. त्यानंतर त्याच रागातून पुन्हा सायंकाळी आदिवासी समाजाच्या त्याच महिलेच्या सोबत तिचे इतर तीन नातेवाईक यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या घरी येवून घरात प्रवेश करून फिर्यादी व त्यांचे पत्नीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच आरोपी क्र. तीन यांनी फिर्यादी यांच्या पत्नीचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न करून धक्काबुक्की केली. साक्षीदार कामगार याला देखील त्यांच्या रूममध्ये प्रवेश करून धक्काबुक्की करून शिवीगाळ मारहाण केली. आरोपी नं. 1 यांनी तुमच्यावर अॅट्रॉसिटीची केस टाकुन पाच लाख रूपये भरून घेईन अशी धमकी दिली. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात विनयभंगासह भा.दं.वि.स. च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून नागोठण्याचे सपोनि. हरेष काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. गणेश भोईर हे अधिक तपास करीत आहेत.