जातीय कलह प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सोशल मिडीयाचा आधार घेत दोघांनी जातीय कलह निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेस बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांविरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना शनिवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. सोशल मिडीयाचा अधार घेत जातीजातीमध्ये वाद करणार्‍यांवर रायगडचे सायबर सेल विभाग लक्ष ठेवून होते. सोशल मिडीयाचा गैरवापर करीत आम्ही रायगडकर या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आली. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण  करून जाती-जातीमध्ये वाद घालण्याचा प्रयत्न करणार्‍या या दोघांविरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (2008 चे सुधारणेसह) 66 ल प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून  त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय जाधव करीत आहेत.

Exit mobile version