मनसे उपजिल्हा प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल

। पेण । वार्ताहर ।
पेण पोलीस ठाण्यामध्ये मनसे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकुर व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईल दुकानदारास शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या गुन्हयातील फिर्यादींचे कृषी उत्पन्न बाजार समिती पेण येथे गाळा नं. 36 व गाळा नं. 37 मध्ये मोबाईल सर्व्हिसिंगचे दुकान आहे. आरोपी संदीप ठाकुर याने व त्याच्या सहकार्याने दुकानात अनधिकृतपणे प्रवेश करुन फिर्यादीस शिवीगाळ केली. तसेच मोबाईल एक तासाच्या आत दुरुस्त करुन दयावा, अशी मागणी केली.

त्यानंतर आरोपी व त्याच्या साथीदाराने फिर्यादीच्या दुकानाला बाहेरुन बंद करुन फिर्यादी व साक्षीदार यांना अडकवून ठेवले. याबाबत पेण पोलीस ठाण्यात आरोपी संदेश ठाकुर व दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार टेमकर करीत आहेत.

Exit mobile version