| माणगाव | प्रतिनिधी |
शिवीगाळ व मारहाण प्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाटणूस आदिवासीवाडी येथे घडला. याबाबतची फिर्याद नथुराम जयराम वाघमारे (45) यांनी दिली.
नथुराम वाघमारे यांनी आरोपी विठ्ठल गणेश वाघमारे, रा. पाटणूस आदिवासी वाडी ता. माणगाव यांच्याकडून त्यांची वडिलोपार्जित आदोली (धान्य मोजण्याचा लोखंडी भांडे) आरोपीस सांगून त्यांच्या घरी घेऊन गेला. मात्र त्याने ते परत दिले नाही. या गोष्टीचा मनात राग धरून आरोपी विठ्ठल याने वाघमारेला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी घरात गेला. त्याने लाकडी दांडक्याने वाघमारेंच्या डोख्यात मारुन दुखापत केली. तसेच वाघमारेंच्या सहकाऱ्याला धक्काबुक्कीकरून व शिव्या देत मारण्याची धमकी दिली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लहांगे हे करीत आहेत.






