विनयभंगप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

| उरण | वार्ताहर |

फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार जबरदस्ती करून ब्लॅकमेल करणे व मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात उरण पोलीस ठाण्यात खंडणी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीमध्ये जून 2023 पासून आजतागायत आरोपीने सतत फिर्यादीचे घरी उरण येथे व आरोपीच्या राहते घरी वाणी आळी येथे फिर्यादीला बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध, संमतीशिवाय वारंवार जबरदस्ती केली. तसेच फिर्यादीचे व्हिडीओ व फोटो काढून ते दाखवून व्हायरल करण्याची धमकी आरोपीने देऊन 20 हजार घेऊनही फिर्यादीस वारंवार शिविगाळ करून तू जर मी सांगितल्याप्रमाणे केले नाहीस तर मुलीवर अत्याचार करेन, अशी दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या सहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यापुढे जाऊन आरोपी फिर्यादीस रस्त्यात अडवून सतत पैशाची मागणी करीत होता. आरोपीच्या पत्नीने फिर्यादीस दमदाटी व शिविगाळ करून धक्काबुक्की केली. फिर्यादीचे पती यांना आरोपीचे अश्लील व्हिडीओ व फोटो दाखवीत त्यांच्याकडे 50 व 80 हजारांची सतत मागणी केली. तसेच फिर्यादीकडे 20 हजारांची मागणी केली. संगनमताने फिर्यादीविरोधात कट रचल्याचा आरोप ठेवून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आर. सी. घनवट करीत आहेत.

Exit mobile version