तरुणावर गुन्हा दाखल

| रसायनी | वार्ताहर |

मोहोपाडा येथील एका शाळेत शिकणारी दहा वर्षीय पीडित मुलगी ही आरोपी रूपेश दत्ता पारिंगे (35), रा. वयाळ याच्या रिक्षामध्ये आपल्या घरी परत येत होती. बुधवारी (दि. 15) रोजी तसेच मागील दोन महिन्यांपासून वाशिवली येथील रामा कंपनीसमोरील रस्त्याजवळील झाडाजवळ आरोपी रूपेश दत्ता पारिंगे याने जाणीवपूर्वक त्याच्या जवळ असणार्‍या मोबाईलमधील अश्‍लील व्हिडिओ पीडित दहा वर्षीय मुलीस दाखवले. यापूर्वीही गेले दोन ते तीन महिन्यात चारवेळा अश्‍लील व्हिडिओ आरोपीने या मुलीस दाखवले आहेत. सदर मुलगी अनुसूचित जाती जमातीची व अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपी रूपेश पारिंगे याने हे कृत्य केले आहे. याबद्दल पीडित मुलीने आपल्या आईला सदर प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने रसायनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून, आरोपी रूपेश दत्ता पारिंगे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version