शासकीय कामात अडथळा तिघाजणांवर गुन्हा दाखल

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पालिका कर्मचार्‍यांना मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपती विसर्जन केल्याच्या ठिकाणावरून कर्मचार्‍यांनी हातात मातीऐवजी त्यांना दगड दिल्याचा राग येऊन दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पृथ्वीराज बंडू शिंगरे, क्षितिज पृथ्वीराज शिंगरे, हर्षवर्धन पृथ्वीराज शिंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पोदी, नवीन पनवेल स्मशानभूमीजवळ गाढी नदी येथे गणपती विसर्जन करताना घडला.

Exit mobile version