| पनवेल | वार्ताहर |
ज्येष्ठ नागरिकाच्या घरी केवायसी अपडेट करण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रदीप सदावर्ते (70) , राहणार खारघर, सेक्टर 6 याच्या विरोधात बी एन एस कलम 74 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय महिला बँकेत नोकरी करत असून त्या प्रदीप सदावर्ते यांच्या घरी केवायसी अपडेट करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलेला हाताला धरून खुर्चीत बसवले आणि पाठीवरून हात फिरवला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.