| पनवेल | वार्ताहार |
देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी कोपरागाव, सेक्टर 10 येथील एका व्यक्तीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरा गाव प्रवेशद्वाराजवळ मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्लास्टिकच्या पिशवीत मद्य असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता संबंधीत व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नरेंद्र पाटील (38, रा. कोपरागाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मद्यविक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
