जीएसटी कमिशन लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील ग्राहकाकडून जीएसटीच्या नावाखाली जमा केलेली रक्कम जीएसटी खात्यात जमा न करता अपहार करण्यात आल्याची घटना कर्जत येथे घडली आहे. साधारण साडे सहा लाखांचा अपहार करण्याच्या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी सावळे गावातील तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 04/07/2020 ते दि. 21/10/2022 या कालावधीत मौजे व्हिजन इंडिया सेल्स अँड सर्व्हिसेस या कंपनीचे कर्जत शहरातील नानामास्तर मुद्रे या भागात कार्यालय आहे. त्या कार्यालयात सावळे गावातील तरुण जीएसटी वसूल करून देण्याच्या मोबदल्यात कमिशन बेसेसवर काम करीत होती. त्या तरुणाने कंपनीच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2022 या ग्राहकांकडून जीएसटी रक्कम जमा केली. मात्र, ती रक्कम जीएसटी कार्यालयात जमा केली नाही.

ग्राहकांकडून वसूल केलेली साधारण 6,64,464 एवढी रुपये जी.एस.टी विभागाकडे भरणा केली नाही आणि केला. त्याचवेळी या तरुणाने त्यातील 3,74,852 रूपयांची जीएसटीची खोटी बिले तयार करुन ती बिले जीएसटी विभागाकडे भरणा केल्याचे संबंधित ग्राहकांना कळविले. ग्राहकांचे साडे सहा लाख रुपये आणि खोटी बिले जमा करून केलेला अपहार हा जवळपास दहा लाख 39 हजार रुपये यांचा असून, त्या अपहाराबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे ग्राहकांकडून गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या सावळे गावातील तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version