| पनवेल | वार्ताहर |
मार्च महिन्यात कमलेश हा कारमालक वाल्मीक गोपाळ यांच्या घरी आला आणि त्यांच्या बहिणीचे पती आर्मीमध्ये असून त्यांना पनवेल ते मंत्रालयात जाण्यासाठी पाच दिवसांकरीता कार (एमएच- 46-सीएच-7599) पाहिजे असल्याची विनंती केली. यावेळी पाच दिवसांनी कार परत आणून देतील या विश्वासाने कारमालकाने कार कमलेश यांना दिली. पाच दिवसानंतर कार घरी घेऊन येण्याबाबत सांगितले. त्यानंतर आणखी दहा दिवस कार वापरण्यास हवी असल्याचे कमलेश यांनी सांगितले. दहा दिवसानंतर फोन केला असता (दि.17) एप्रिल रोजी कार ताब्यात देतो, असे सांगितले. त्यानंतर कमलेश यांचा फोन बंद येऊ लागला. काही दिवसांनी कमलेश वरसाळे यांच्यासोबत संपर्क झाला, असता कार गहाण ठेवली असल्याचे सांगितले. 17 लाख रुपये किंमतीची कार परस्पर गहाण ठेवून कारचा अपहार केल्याप्रकरणी कमलेश वरसाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.