अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

सुकापुर येथील कोकण आगरी रुची हॉटेल या ठिकाणी स्वयंपाकी म्हणून सचिन यशवंत मोहिते हा नोकरीसाठी होता. मात्र, सचिनकडून स्वयंपाकी कामाव्यतिरिक्त सर्व प्रकारची वेठबिगारीची कामे जबरदस्तीने करून घेण्यात येत होती. तसेच, तो आजारी असताना त्याला डॉक्टरांना न दाखवल्यामुळे योग्य तो औषधोपचार न मिळाल्याने त्याचे निधन झाले. या प्रकरणी हॉटेल मालक हेमंत पाटील आणि त्यांचा मुलगा मनीष पाटील यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अन्वये खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version