तरुणीवर अत्याचाराप्रकरणी पोलिसात गुन्हा

| पनवेल | वार्ताहर |

खारघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका पंचवीस वर्षांच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब वाशीमध्ये घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मागील दोन वर्षांत वाशीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा अत्याचार केल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी याबाबत बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा या व्यक्तीविरोधात नोंदविला आहे.

अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने मोठ्या पदावर काम करत असल्याचे भासवून या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमात अडकवले. पीडितेचा विश्वास संपादन केल्यावर सानपाडा येथील हॉटेल स्काय स्वीटमध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अत्याचार करताना त्याने पीडितेचे चित्रण केले. पीडितेने इतर कोणाशी लग्न केल्यास संबंधित चित्रण समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्याची तसेच जो कोणी पीडितेशी लग्न करेल त्यालासुद्धा पाठवण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेचे लग्न मोडले. अखेर खारघर पोलिसांत पीडितेने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Exit mobile version