मुरुडमध्ये दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील उसरोली येथे राहणार्‍या यशोदा सोनू बिरवाडकर यांचे घर बांधण्यासाठी त्यांनी गावालगत राहणार्‍या दोन व्यक्तीस घर बांधण्याचे काम दिले. परंतु, घर अर्धवट ठेवून पैसे मात्र उकळलेले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार यशोदा बिरवाडकर यांनी नोंदवली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अदाड येथील पांडुरंग महादेव पाटील व खारीकवाडा येथील महेशवर अशोक ठाकूर यांनी कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून यशोदा बिरवाडकर यांच्या घराचे काम घेतले. घर बांधण्याच्या कराराप्रमाणे फिर्यादी यांचे घर पूर्ण केले नाही. घर पूर्ण करतो असे सांगून फिर्यादीकडून 2 लाख 46 हजार अशी रक्कम घेतली. घराचे काम कधी पूर्ण करणार असे विचारले असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार बिरवाडकर यांनी मुरुड पोलीस ठाण्यात नोंदवताच या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version