एसटी चालकाचा स्टंट! मोबाईलवर बोलत घाटरस्त्यावर केली ड्रायव्हिंग

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
लालपरीचा प्रवास, सुरक्षित प्रवास असे ब्रीदवाक्य सांगणार्‍या एसटी महामंडळाला आपल्याच ब्रीदवाक्याचा विसर पडलेला दिसत आहे. कारण घाटरस्त्यात प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता मोबाईलवर बोलत निष्काळजीपणाने एसटी बस चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार बसमधून प्रवास करणारे रायगडच्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे समन्वयक माजी प्राचार्य अ.वि.जंगम यांनी कॅमेर्‍यात कैद केला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नये, अशा सूचना एसटी प्रशासनाकडून चालकांना दिल्या जातात. त्यासंदर्भात चालकांचे प्रबोधनही केले जाते. मात्र, चालकच या नियमाला हरताळ फासत असल्याचे समोर आले आहे. माजी प्रा. जंगम यांना विघवली येथे जायचे होते. त्यासाठी त्यांनी महाडहून सकाळी 7.30 वाजता एसटी पकडली. या बसचे चालक पी.एस.जायभाय हे या मार्गावर बस चालवीत असताना रायगड, खिंड ते गांधारपाले गावापर्यंत मोबाईलवर बोलत असल्याचे जंगम यांनी सांगितले. एका हातात मोबाईल व एका हातात स्टिअरिंग धरुन ते बोलत होते. हा रस्ता वळणांचा असून या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या जिवाशी खेळणार्‍या चालकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जंगम यांनी केली आहे.

या घटनेमुळे ज्याच्याकडे एसटी बसची धुरा असते, त्या चालकानेच निष्काळजीपणा केला, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो आहे. बस चालकाचा हा प्रताप प्रवाशाने मोबाईल कॅमेर्‍यात कैद केल्याने समोर आला आहे, मात्र कित्येक ठिकाणी असे प्रकार घडत असतील, याची नोंदच नाही. त्यामुळे आता तरी एसटी महामंडळ हे प्रकार गांभीर्याने घेत प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा जंगम यांनी व्यक्त केली आहे.श्रीवर्धन:- कोकण मराठी साहित्य परिषद, रायगडचे समन्वयक, ज्येष्ठ नागरिक, माजी प्राचार्य श्री.अ.वि.जंगम हे दि. 8 रोजी

Exit mobile version