। पिंपरी-चिंचवड । वृत्तसंस्था ।
लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गिरिजा गणेश शिंदे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवडमधील गणेश नगरमध्ये बुधवारी दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास चार मुलं खेळत होती. त्यापैकी दोघेजण लोखंडी गेटच्या आत गेले, त्यानंतर गिरिजा आणि तिची दुसरी मैत्रीण ठीक गेटच्या समोर आली. यावेळी दुसरा मुलगा गेट ओढत असताना ते शेकडो किलोचे गेट चिमुकलीच्या अंगावर पडून ती गेट खाली दबली गेल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लोखंडी गेट पडून चिमुकलीचा मृत्यू
