। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.25) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करंजाडे सेक्टर 7 मध्ये ही घटना घडली. तरुणाने सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली. ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करंजाडे सेक्टर 7 मध्ये ही घटना घडली. आरोपी नागेश वाल्या काळे (28) हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तू वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दत्तू काळे यांचा मुलगा दिपक याच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नागेश काळेला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी!
