| अलिबाग | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथील बंद घर चोरट्याने फोडले. रोख रकमेसह 15 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
मुंबई येथे सध्या राहणाऱ्या फिर्यादीचे तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथील घर बंद होते. चोरट्याने या संधीचा फायदा घेतला. मंगळवारी दोन जानेवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. त्यांनी घरातील रोख रकमेसह ऐवज चोरी केला. याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सुरेश पवार अधिक तपास करीत आहेत.