| पनवेल | वार्ताहर |
मतदानासाठी रांगेत उभे असताना अमुक-अमुक उमेदवाराला मतदान करू नका, असे बोलत असताना एका व्यक्तीने याची तक्रार केल्यानंतर एका विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईलाईट स्कूल, तळोजा फेस वन या ठिकाणी मतदार मतदान करण्यासाठी रांगेत उभे असताना दुपारी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान दोघेजण गप्पा मारत होते. यावेळी अमुक एका उमेदवाराला मतदान करू नका, असे एक इसम सांगत होता. याबाबतची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांकडे केली. त्यानंतर तळोजा पोलिसांनी या इसमाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.