राशिद खानचा कौतुकास्पद निर्णय

विश्वचषकातील फी भूकंपग्रस्तांना दान

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. त्या विश्वचषक स्पर्धेत मिळालेली संपूर्ण मॅच फी भूकंपग्रस्तांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. राशिद खान याच्या या निर्णायाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

राशिद खान हा जगातील लोकप्रिय आणि महान गोलंदाजापैकी एक आहे. तो जितका चांगला गोलंदाज आहे, तितकाच तो एक चांगला माणूसही आहे. याचा पुरावा ते अनेकदा त्यांच्या चांगल्या स्वभावाने दिला, आजही त्याने आसाच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे.

राशिद खान याने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये (हेरात, फराह आणि बादघिस) भूकंप झाल्याचे ऐकूण मला खूप वाईट वाटले. भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सर्व सामन्याची फी दान करत आहे. लवकरच आम्ही एक फंड रेसिंग अभियान सुरु करणार आहोत, ज्याद्वारे त्या सर्व लोकांना मदत मिळेल, असे ट्वीट राशिद खान याने केले आहे. राशिद खान याच्या या निर्णायाचे सर्वाच स्तरातून कौतुक केले जात आहे. जगभरातून अफगाणिस्तानला मदतीचा हात मिळत आहे.

Exit mobile version