‘जाणीव’ सामाजिक संस्थेची बांधिलकी

बेघर आदिवासी कुटुंबाला अन्नधान्याची मदत
| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील जांभुळपाडा गावातील आदिवासी वाडीवर एका आदिवासी बांधवाचे घर मुसळधार पावसामुळे कोसळून राम कातकरी याचा मृत्यू झाला होता. जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने या कुटुंबाला सामाजिक जाणिवेतून अन्नधान्याची मदत करण्यात आली. त्यामध्ये तांदूळ, गहू, सर्व कडधान्य, डाळी, खोबरे, मसाले, साखर, पोहे, रवा, पीठ, गूळ, गोडेतेल तेल, बिस्कीट, साधारणतः दोन-तीन महिन्यांचे धान्य देऊन त्याचं आयुष्य कायमस्वरुपी सुखकर होईल अशी परिस्थिती निश्‍चितपणाने नाही. मात्र, समाजाच्या प्रती आपणही काही देणं लागतो आणि जाणीव सामजिक संस्था समाजसेवेसाठी कायम जागृत असते. त्यामुळे ही छोटीशी मदत जाणीव सामाजिक संस्थेने केली आहे.

जांभूळपाडा येथील आदिवासी वाडीवर घर कोसळून राम कातकरी याचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब निराधार झाले होते. त्यावेळी घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी धाव घेत कातकरी कुटुंबियांना तातडीने दहा हजारांची आर्थिक मदत केली होती. तसेच या कुटुंबियांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्य यांची मदत करण्याचे आवाहन राजू मुंबईकर यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला अनेक सामाजिक संघटना प्रतिसाद देऊन मदतीचा हातभार लावत आहेत. यावेळी जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश केणी, सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर, अनिल उलवेकर, संतोष यादव, अजिंक्य पाटील आदी मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version