खेळाडूची वेगळी गोष्ट सांगणारी स्पर्धा

| पॅरीस | वृत्तसंस्था |

पॅरालिम्पिक ही एक सर्वसामान्य स्पर्धा असली तरी ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूची एक वेगळी गोष्ट सांगत असते. अशाच एका भारतीय खेळाडूची एक वेगळी गोष्ट जगासमोर येत आहे. मरिय्यपन थंगवेलू असे या खेळाडूचे नाव आहे.

मरिय्यपन थंगवेलू हा भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये सहभागी होणार आहे. तो यंदा तिसऱ्यांदा पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. मरियप्पनने आत्तापर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्या असून अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. पण त्याचा हा प्रवास इथपर्यंत सोपा नव्हता.

मरियप्पन 9 वर्षांचा असताना शाळेत जाताना त्याचा अपघात झाला होतो. परिणामी त्याला त्याचा पाय गमवावा लागला. पण त्याने हार मानली नव्हती. त्याच्या शारिरीक शिक्षणाच्या शिक्षकांनी त्याला उंच उडीमध्ये प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याने तिथून हळुहळू प्रगती करण्यास सुरूवात केली. त्याला नंतर भारतीय क्रीडा प्राधिकरनाकडूनही मदत झाली.

यानंतर त्याला 2016 रिओ पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी उंच उडी 42 प्रकारात 1.89 मीटर अंतर पार करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर त्याने अनेक बक्षीसं मिळवली. 2019 साली वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये उंच उडी 63 प्रकारात कांस्य पदक जिंकले. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्येही निराश न करता 63 प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. तर, काही महिन्यांपूर्वी सुवर्णपदकाला देखील गवसणी घातली आहे. त्यामुळेच आता पॅरिसमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा केल्या जात आहेत.

Exit mobile version