| रसायनी । वार्ताहर ।
गोमांसाची वाहतूक करणारा कंटेनर रसायनी पोलिसांनी भाताण भोगद्याच्या जवळ पकडला. गेल्या आठवड्याभरात गोमांसाची वाहतूक करणार्या वाहनांना पकडण्याची ही तिसरी वेळ आहे. सदर बाबतीत विशेष वृत्त असे की, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भाताण बोगद्याजवळ एक कंटेनर रसायनी पोलिसांना संशयास्पद आढळल्याने त्याची पाहणी केली असता त्या कंटेनरमध्ये 10 लाख आठ हजार रूपये किंमतीचे गोमांस आढळले. सदर प्रकरणी कंटेनर (क्र. एचआर 38 एस 7280) चालक पेशकुमार ध्रुवनारायण सिंग (रा. बिहार) यास रसायनी पोलिसांनी कोणतीही कागदपत्र जवळ न बाळगता अवैधरित्या गोमांसाची वाहतूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.
त्याच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंटेनर हा तेलंगणा येथील असून कंटेनरचा मालक अंकुश याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी कंटेनर आणि गोमांस असा एकुण 45 लाख आठ हजार रूपयांचा मुद्देमाल रसायनी पोलिसांनी जप्त केला आहे. सदर प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद पाटील हे तपास करीत आहेत.