‘या’ मार्गावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प

| महाड | प्रतिनिधी |
पोलादपूर महाबळेश्वर राज्य मार्गावर – कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली. यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.शुक्रवारी (दि.8) सकाळी ही घटना घडली. याशिवाय पायटा गावाजवळ एक झाड रस्त्यावर झुकल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे.

पोलादपूर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मागील 24 तासांत पोलादपूर तालुक्यात 41 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसामुळे पोलादपूर – महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणे गावाजवळ दरड, मातीचा ओसरा खाली आला. त्यामुळे काही तास वाहतूक खोळंबली होती. पोलादपूर आपत्ती नियंत्रण कक्ष आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या पथकाने माती बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

Exit mobile version