केळघर मुरूड मार्गावर दरड कोसळली

मुरूड मार्गावर वाहतुकीला अडथळा, प्रवाश्यांचे हाल
मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या आठ दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने डोंगर कड्यावरील माती, दगड सैल झाले आहेत. नवीन रस्त्यावर देखील खड्डे माती, झाड पडल्याचे रोहा-केळघर-मुरूड मार्गावर वाहतुकीला अडथळे येत आहेत. या बाबत या मार्गावर नेहमी प्रवास करणारे मुरूड तालुका धनगर समाज अध्यक्ष धर्माजी हिरवे, यांनी सांगितले की, या मार्गावरील कवळठे आदिवासी वाडीजवळ गेल्या वर्षी वाहून गेलेल्या रस्त्याला नवीन मोर्‍या बांधण्यात आल्या आहेत. परंतु आजू बाजूच्या रस्त्यावरील माती वाहून जाऊन पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले असून अपघातास कारणीभूत ठरणारे आहेत. या मार्गावरून रात्री बेरात्री वाहनांची ये-जा सुरू असते. खड्यांमुळे वाहने खिळखिळी होत आहेत. प्रवाशांना देखील प्रचंड त्रास होत आहे. ही बाब संबंधित खात्याने त्वरित मार्गी लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version