शेतकरी गटाने बांधला बंधारा

| चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर येथील महागणपती सेंद्रिय शेती बचत गटाच्या मार्फत शेतावरच्या ओढ्याला बंदिस्त करून, श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. पाऊस गेला की, ओढे काही दिवसातच कोरडे पडतात. यामुळे गाव पातळीवर वनराई बंधारे बांधून, पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे काळाची गरज आहे. हे वनराई बंधार्‍यांचे पाणी रब्बी हंगामातील पिकांसाठी तसेच विहिरींच्या पाण्याच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे शेतकर्‍यांनाही भाजीपाल्याचे उत्पादन घेता येते. तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न ही मार्गी लागतो. विशेष म्हणजे गुरांची व जंगली प्राण्यांची तहान भागविण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो.

म्हणून चिरनेर येथील महागणपती सेंद्रिय शेती बचत गटाचे गटप्रमुख व कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील, कृषी सहाय्यक निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबवून, श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version