विश्राळी तलावात आढळला मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

शहरातील गुजराती शाळेजवळील विश्राळी तलावात एक अनोळखी इसम पाण्यात बुडलेल्या अवस्थेत मिळून आल्याची घटना घडली आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

या इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे असून, अंगाने सडपातळ, रंग सावळा, उंची अंदाजे 5 फूट 5 इंच, डोक्याचे केस काळे, दाडी मिशा वाढलेली काळी, नाक जाडसर तसेच अंगात काळी अंडरविअर आहे. त्याचप्रमाणे मयत इसमाच्या उजव्या खांद्यावर त्रिशुल व ओम गोंदलेले असून, उजव्या डोळ्याच्या वर जखम आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version