म्हसळ्यात बोट बुडून एक मयत

म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यात मेंदडी येथील दोन मच्छिमार बोटीला पाण्यातून वाहून जाऊ नये म्हणून ती काढण्यासाठी गेले असता खाडीच्या प्रवाहात बोट अचानक हेलकावे खाऊन पलटी झाली. खाडी किनारी खेकडी पकडणार्‍या काही तरुणांनी त्यांना बुडताना वाचवीण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी एकाला वाचविण्यात त्यांना यश आले मात्र एक 40 वर्षीय सुरेश हरेश पायकोळी या तरुणाला वाचविण्यास त्यांना अपयश आले.

सुरेश पायकोळी हा संध्याकाळ पासून बेपत्ता आहे. सायंकाळी सात नंतर अंधार पडल्याने शोधकार्य बंद करण्यात आले आणि आज पुन्हा सकाळी 9 वाजल्यापासून महाड येथील साळुंखे यांची टीम आणि मच्छिमार, ग्रामस्थ यांच्या मार्फत बेपत्ता मच्छिमारास शोध कार्य पुन्हा सुरु झाले मात्र दुपारी चार वाजेपर्यंत काहीही हाती सापडले नसल्याचे निदर्शनास आले.बेपत्ता सुरेश पायकोळी यास लहान -लहान पाच मुले आहेत. तहसीलदार शरद गोसावी हे आपल्या सहकार्यन्सह घटनास्थानी तातडीने रवाना होऊन सद्यस्थिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Exit mobile version