रानमेवा मिळविण्यासाठी जीवघेणी धडपड

उन्हाळ्यातील एकमेव उदरनिर्वाहाचे साधन

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

जंगलातील तयार झालेला रानमेवा बाजार पेठेत येत असले तरीसुद्धा हा रानमेवा काढण्यासाठी जीवघेणी धडपड करावी लागत आहे. रस्त्यालगत जांभूळ, कैर्‍या तसेच करवंदे अशी विविध झाडे असून या झाडावर आलेली फळे काढताना वाहानांमुळे अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर संभवत आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी ही जीवघेणी धडपड करावी लागत असल्याचे आदिवासीं बांधवांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

रणरणत्या उन्हामध्ये रानमेवा तयार झाल्यामुळे अदिवासीं बांधावांना रोजगार मिळत आहे. यामुळे रोजच्या दैनंदिन व्यवहारात अर्थिकची समस्या मार्गी लागत आहेत. उन्हाळ्यात आलेला रानमेव्यामुळे उदरनिर्वाह होत आहे. यामुळे निसर्गातील तयार होत आसलेली फळे अदिवासींसाठी मोठा दिलासा देत आहे.

उन्हाळा सुरु झाला की हाताशी काही काम मिळत नसल्यामुळे जंगलातील निर्माण होत असलेला रानमेवा अदिवासींचे उदार निर्वाहाचे साधन निर्माण करून दिले आहे. दोन महिने जणू या बांधवांसाठी हक्काचा रोजगार मिळत आहे. जंगलामध्ये तसेच रस्त्यालगत असलेल्या वृक्षांवर आलेली फळे काढण्यासाठी घरातील सर्वच सदस्य एकत्र जमा होत असतात. रस्त्यावर वेगाने येत असलेले वाहनांची पर्वा न कर्ता आपल्याला मोठ्याप्रमाणावर हा रानमेवा कसा मिळेल, हाच विचार मनामध्ये रेंगाळत असतो. मात्र, कधी-कधी हाच रोजगार त्यांच्या जिवावर उमठत आहे.

Exit mobile version