आनंददायी बालसंस्कार मेळावा संपन्न

| आगरदांडा | प्रतिनिधी |
सर्वांगीण विकासासाठी विविध खेळ, संस्कार वर्ग, मेळावे या सर्वच प्रकारच्या गोष्टी कारणीभूत असतात. या दृष्टिकोनातूनच आगरदांडा केंद्र अंतर्गत ग्रामपंचायत राजपुरी येथे आनंददायी बाल संस्कार मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे राजपुरी सरपंच हिरकणी गिदी, अदानी फाऊंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजपुरी नरेंद्र घागरी, राजपुरी जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक सुचेनी पाटील, केंद्रप्रमुख जितेंद्र मकु, मुख्याध्यापिका आगरदांडा अलका शिंदे, मुख्याध्यापिका डोंगरी शुभांगी नार्मोड, मुख्याध्यापक मिठागर कृष्णा पाटील, मुख्याध्यापक खामदे निलेश भेरे, मुख्याध्यापिका नांदले मंगला मोरे, मुख्याध्यापक टोकेखार मंगेश शिंदे, दुर्वास घागरी, राजन गीते, युवा मंडळ, महिला मंडळ आगरदांडा, राजापुरी, डोंगरी, मिठागर, खामदे, राजापुरी, टोकेखर येथील मराठी व उर्दू जिल्हा परिषदेच्या शाळा सहभागी झाल्या. सर्वच शाळेतील एकूण 438 विद्यार्थी, 150 पालकवर्ग समाज अध्यक्ष, पंच पुढारी, महालक्ष्मी मच्छीमार सहकारी संस्था संचालक मंडळ, आणि ग्रामवसी उपस्थित होते.

Exit mobile version