धोनीसाठी अजब पराक्रम

| चेन्नई | वृत्तसंस्था |

मागील वर्षी एका चाहत्याने धोनीला पाहण्यासाठी बाईक विकून आलेल्या पैशाने चेन्नईच्या मॅचची तिकीट विकत घेतली होती. याचदरम्यान आता एका चाहत्याने सांगितले की, धोनीला बघण्यासाठी तिकीट मिळू शकले नाही, म्हणून तिकीटांचा काळाबाजार करणार्‍यांकडून 64 हजार रु.ची या सामन्याची तिकीट विकत घेतली आणि एवढी मोठी रक्कम मोजली. आणि आता मला माझ्या मुलील्या शाळेची फी भरायची आहे, पण आम्हाला एमएस धोनीला एकदा तरी बघायचे आहे. या चाहत्याला आणि त्याच्या मुलींना मैदानावर खेळताना धोनीची एक झलक पहायची होती, असं तो म्हणाला.

Exit mobile version