कर्तव्यनिष्ठ अधिकारी जनतेच्या आठवणीत राहतो – नितीन फुलसुंदर

| रसायनी | वार्ताहर |

कर्तव्यनिष्ठ अधिकारी जनतेच्या आठवणीत राहतो आणि वरिष्ठांच्या मर्जित राहतो, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपले शासकीय योजनेतील आपले काम करणे सोपे जाते, असे भावनिक उद्गार उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर यांनी काढले.

खालापूर तालुका कृषी पर्यवेक्षक एस.टी. धुमाळ यांची पदोन्नतीने होऊन ते मंडळ कृषी अधिकारी तालुका खामगाव येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ तालुका कृषी अधिकारी कार्यालय खोपोली यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ए.टी. धुमाळ यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. ए.टी. धुमाळ यांनी खालापूर तालुक्यात चांगले काम केले असून, अनेक शेतकर्‍यांना त्यांनी लाभ दिला आहे. कृषी विभागाच्या अनेक योजना त्यांनी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. एक कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी ए.टी. धुमाळ यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमास खालापूर मंडळ कृषी अधिकारी जे.के देशमुख, कृषी परीवेक्षक चौक नितीन महाडिक,जेष्ठ पत्रकार अर्जुन कदम, कृषी विभाग कार्यालयातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कार्यालयीन कर्मचारी, उपविभागातील कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version