न्हावे स्मशानभूमीत जनसागर उसळला
| उरण | वार्ताहर |
न्हावे गावात मंगळवारी (दि.17) सकाळी हृदय हेलावणारा आणि भावूक क्षण पाहायला मिळाला. गावातील लाडकी मुलगी, मैथिली पाटील हिच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी व अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांसह नातेवाईक, मित्रमंडळी, महिला आणि तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मैथिलीचं पार्थिव सकाळी तिच्या गावी पोहोचताच संपूर्ण न्हावे गाव शोकसागरात बुडालं. तिच्या अंतिम यात्रेच्या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. न्हावे गावातील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात मैथिलीला अंतिम निरोप देण्यात आला. तिच्या जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, अजूनही गाव त्यातून सावरलेला नाही.





